फुलसौंदर मळा येथील वैष्णव मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सदैव स्मरणात ठेवले पाहिजे
- भगवान फुलसौंदर
नगर - छत्रपती शिवाजी महाराजांनी शुन्यातून विश्व निर्माण करुन जनतेला भयमुक्त जीवन जगण्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युग पुरुष ठरले आहेत. त्यांचा आदर्श सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जेवढे बोलू तेवढे थोडे आहे. त्यांनी स्वराज्याच्या माध्यमातून आपला आदर्श जगासमोर ठेवला. त्यामुळे आज प्रत्येक गोष्ट म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव पुढे येते. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावले. त्यांचे विचार आपण फक्त जयंती व पुण्यतिथीच्या दिवशीच न ठेवता सदैव स्मरणात ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
फुलसौंदर मळा येथे वैष्णव मित्र मंडळाच्या वतीने बसस्थानक चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, भिंगार बँकेचे संचालक विष्णु फुलसौंदर, अशोक बाबर, अशोक दहीफळे, परेश लोखंडे, एल.के.आव्हाड, मनोज फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, गणेश नन्नवरे, अवधुत फुलसौंदर, अविनाश फुलसौंदर, अभिजित ठमके, अशोक फुलसौंदर, गोरख फुलसौंदर, धनंजय फुलसौंदर, नितीन फुलसौंदर, अभिजित झावरे, श्रीकांत गायके, छोटू शिंदे, ओंकार फुलसौंदर, भरत फुलसौंदर, अक्षय फुलसौंदर, विवेक फुलसौंदर, महेश फुलसौंदर, अशोक खाडे, हरी मकोने, सचिन फुलसौंदर, हर्षल म्हस्के, मयुर वांडेकर, वैभव गाडीलकर, अनिरुद्ध सांळूके, गौरव ढोणे, महादेव मिसाळ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विष्णू फुलसौंदर म्हणाले, शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवराया नंतरही अनेक राजे उदयास आले. पण सर्वात आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. याचे कारण आहे त्यांचे स्वराज्य बद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य. शेतकर्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते. शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत,असे त्यांनी सांगितले.
Post a Comment