सावेडीत भागवत कथा सप्ताहाची भव्य भगवेमय मिरवणुकीने प्रारंभ


सावेडीत भागवत कथा सप्ताहाची भव्य भगवेमय मिरवणुकीने प्रारंभ 
नगर - ' गोविंदम हरी गोपालम' नामाच्या जयघोषात अहिल्यानगर ऐतिहासिक शहरात सावेडी मध्ये भागवत कथा सप्ताहाची भव्य भगवेमय मिरवणुकीने प्रारंभ झाला. डोक्यावर तुळस, गळ्यात विना, टाळ मृदुंगाच्या गजरात राधाकृष्ण यांच्या भजनाने कथा प्रवचनकार प.पू स्वामी प्रत्ययानंद सरस्वती यांची रथातून मिरवणूक, भगवे वस्त्र परिधान करून स्त्रियांनी हरिनामाचा गजर करीत सावेडी करांचे लक्ष वेधले होते. 
       ती 21 मार्च ते 27 मार्च माऊली सभागृहात चिन्मय मिशनच्या वतीने भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे या कथेच्या प्रारंभिक आज सकाळी मिशनच्या सर्व सदस्यांनी भगवे झेंडे, पताका, उपरणे, टोप्या परिधान करून वातावरण संपूर्ण भगवेमय केले होते. 
     प्रत्ययानंद स्वामी यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली चौका- चौकात स्वामींचे पाद्यपूजन सत्कार सोहळा होत होता. प्रोफेसर कॉलनी चौकात उद्योजक डोके परिवाराने या मिरवणुकीचे स्वागत करून सहभागी असलेल्या सर्व स्त्री, पुरुष यांचे औक्षण केले. स्वामींना भव्य असा गुलाब पुष्पांचा हार अर्पण केला. अशा भगवे मय वातावरणात भागवत कथा सप्ताहास मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला चिन्मय मिशनच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post