श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये कान,नाक, घसा शिबीर संपन्न

श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये कान,नाक, घसा शिबीर संपन्न आधुनिक मशिनरी व आत्मियतेने रुग्णांची काळजी घेणारे हे हॉस्पिटल रुग्णांसाठी वरदान - उद्योजक दिपक बोथरा नगर - आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या शिकवणीनुसार जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्तेआनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून दिवस-रात्र रुग्णसेवेचे व्रत जोपासत आहेत. आम्ही विद्यार्थी दशेत असल्यापासून या हॉस्पिटलच्या कार्याची महती ऐकत आलो आहे, आज प्रत्यक्ष शिबीराच्या उद्घाटननिमित्त हे रुग्णसेवेचे कार्य जवळून पाहण्याचा योग आला आहे. आधुनिक मशिनरी व आत्मियतेने रुग्णांची काळजी हे हॉस्पिटल घेत असल्याने पुणे-मुंबईला जाण्याची संकल्पना कालबाह्य झाली आहे. सर्वसुविधा एकाच छताखाली मिळत असल्याने येथे आलेला रुग्ण पुर्णपणे बरा होऊनच जात आहे. मोफत व अल्पदरातील सेवामुळे रुग्णांवर उपचार होत असल्याने त्यांचा आर्थिक भार कमी होत आहे. त्याचप्रमाणे शासकिय योजना, मेडिक्लेम सुविधामुळे रुग्णांची मोठी सोय होत आहे. तज्ञ डॉक्टर आणि आधुनिक मशिनरी आणि दानशूरांचे सहकार्य यामुळे हे हॉस्पिटल ‘रुग्णांसाठी वरदान’ ठरत असल्याचे प्रतिपादन उद्योजक दिपक बोथरा यांनी केले. जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या 33 व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे आयोजित व उद्योजक रमेशजी दिपकजी बोथरा परिवार (ताराचंदजी हसराज बोथरा) प्रायोजित कान,नाक, घसा शिबीराचे उद्घाटन बोथरा परिवार यांच्याहस्ते झाले यावेळी उद्योजक दिपकजी बोथरा उद्योजक रमेश बोथरा, सौ.अनिता बोथरा, सौ.ज्योती बोथरा, राजेंद्र बोथरा, जितेंद्र बोथरा, प्रकाश बोथरा, सुरेश बोथरा, अशोक बोथरा, पुजा बरमेचा, चार्वी बरमेचा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ.अशिष भंडारी, सुभाष मुनोत, अनिल मेहेर तज्ञ डॉ.सुकेशिनी गाडेकर, डॉ.अतुल तुपे, वाच्या व भाषा उपचार तज्ञ डॉ.अझर शेख आदि उपस्थित होते. याप्रसंगी उद्योजक रमेश बोथरा म्हणाले की, आपल्या साधू-संतांनी जनसेवेचा दिलेला संदेश रुग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा मानून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य निरंतरपणे सुरु आहे. या आरोग्य सेवेत जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते, डॉक्टर, स्टाफ देत असलेले योगदान हे कौतुकास्पद असेच आहे. जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून सुरु असलेले मानवसेवेचे व्रत कौतुकास्पद आहे. आचार्यश्रींनी दिलेल्या शिकवणीनुसार येथे रुग्णसेवा होत असल्याचे पाहून आनंद होत आहे. यावेळी बोलताना डॉ.अतुल तुपे म्हणाले की, कान, नाक, घसा, त्वचारोगावर अनेक रुग्ण त्रस्त आहेत. त्यांना अत्याधुनिक मशिनरीद्वारे आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये तपासणी करून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. आज आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये अनेक उच्च दर्जाचे मशिनरी उपलब्ध आहेत. येथे उपचार घेणारा प्रत्येक रुग्ण हा बरा होऊन आनंदीत घरी जातो, असे त्यांनी सांगितले. प्रास्तविकात अनिल मेहेर म्हणाले, गेल्या 33 वर्षांपासून रुग्णांना आधुनिक व दर्जेदार सेवा देण्याचा आनंदऋषीजी हॉस्पिटलचा प्रयत्न राहिला आहे. दानशूर व्यक्तीमत्वांच्या सहकार्याने विविध विभाग सुरु करुन त्यात आधुनिक मशिनरीच्या सहाय्याने रुग्णांना सेवा दिली जात आहे. रुग्णांचा आर्थिक भार हलका करुन, चांगले उपचार देण्यात आनंदऋषीजी हॉस्पिटल तत्पर आहे. मोफत तपासणी शिबीराच्या माध्यमातून रुग्ण सेवेचे व्रत सुरु आहे. यासाठी दानशूर देत असलेले सहकार्य आम्हाला प्रेरणा देत राहील, असे सांगितले. स्वागत डॉ.प्रकाश कांकरिया यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.आशिष भंडारी यांनी केले तर आभार माणकचंद कटारिया यांनी मानले. या शिबीरात कान, नाक, घसा 160 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post