रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समिती सदस्यपदी अंबादास गारुडकर यांची निवड


रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समिती सदस्यपदी अंबादास गारुडकर यांची निवड

     नगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक श्री. अंबादास गारुडकर यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. अंबादास गारुडकर हे रयत शिक्षण संस्थेचे माजी विदयार्थी असुन लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विदयालय, तसेच श्री अंबिका विदयालय, केडगाव येथील स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य आहेत. उत्तर विभागाचे कार्यक्षेत्र अहिल्यानगर, नाशिक, बीड, नंदुरबार असे 4 जिल्हे आहेत. त्यांचे निवडीबद्दल मॅनेजिंग कौन्सिल चे सदस्य मा. आ. दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य अशोकराव बाबर, उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर नवनाथ बोडखे आदींनी अभिनंदन केले आहे.

     यावेळी बोलतांना अंबादास गारुडकर म्हणाले की, संस्थेच्या उन्नत्ती व प्रगतीसाठी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी नेहमीच प्रयत्न केले आहे. त्या माध्यमातून विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटन करुन ते सोडविले. त्याचबरोबर उपक्रमातून प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आज सर्वांनी एकमताने माझी निवड करुन जो विश्‍वास दाखविला आहे, त्या विश्‍वासास पात्र राहून संस्थेच्या लौकिकात भर घालण्याचे काम करु, असे सांगून पुढील काळात आर्थिक व सामाजिक दुर्लक्षित घटकांकडे अधिक लक्ष दिले जाईल. प्रत्येक घटकांच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन उपक्रम राबविले जातील, असे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post