बागरोजा हडको मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य सजावटछत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री सन्मानाचा आदर्श समाजपुढे ठेवला - रोहिणी शेंडगे


बागरोजा हडको मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य सजावट

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री सन्मानाचा आदर्श समाजपुढे ठेवला - रोहिणी शेंडगे

     नगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जेवढे बोलू तेवढे थोडे आहे. त्यांनी आपल्या स्वराज्याच्या माध्यमातून त्यांनी आपला आदर्श जगासमोर ठेवला. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावले. त्यामुळे आजप्रत्येक गोष्ट म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव पुढे येते.  तसेच स्त्री सन्मानाचा आदर्श समाजापुढे ठेवला, शेतकर्‍यांसाठी ते मदत करत राहीले, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपण फक्त जयंती व पुण्यतिथीच्या दिवशीच न ठेवता कायमपणे स्मरणात राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.

     बागरोजा हडको मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य सजावट करण्यात आली होती. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव, माजी महापौर रोहिणी शेंडगे, संभाजी कदम,  संजय शेंडगे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, सुरेखा कदम, शिलाताई शिंदे, अश्‍विनीताई जाधव, वैशाली नळकांडे, सौ.खैरे, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, दत्ता कावरे, संदिप दातरंगे,  गणेश पिस्का, कैलास शिंदे, सुरेश तिवारी, अण्णा घोलप,दिनकर आघाव गुरुजी आदिंसह मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

     सचिन जाधव म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून मृत्यूपर्यतचा प्रत्येक दिवस हा देशासाठी प्रेरणादायी आहे. ते उत्तम संघटक, प्रशासक होते. राष्ट्र परमवैभवाला नेण्यासाठी शिवराय अंगीकारणे गरजेचे आहे. अशी महान विभूती पुन्हा होणे नाही, अशा शब्दात गौरव केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post