सिव्हील हडकोत हनुमान चालिसा मोठ्या उत्साहत संपन्न ; शेकडो भविकांच्या सहभागाने परिसर हनुमान चालिसाने दुमदुमला
नगर - अहिल्यानगर शहरामध्ये होळी पौर्णिमेपासून ते हनुमान जयंती पर्यंतच्या कालावधीमध्ये हनुमान चालीसा व भजन संधेंचे आयोजन केले जाते. त्याच पार्श्वभूमी सिव्हील हडको या ठिकाणी माजी नगरसेविका कलावती शेळके व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शेळके यांच्या वतीने मंगल भक्त सेवा मंडळ एफ 70 एमआयडीसी या मंडळाच्या हनुमान चालीसा व भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील भाविकांनी भजनसंध्येचा लाभ घेतला. रात्री बारा वाजता महाआरतीनंतर महाप्रसादाचा वाटप शेळके परिवाराच्या वतीने करण्यात आले.
मंगल भक्त सेवा मंडळाच्या सेवकांनी हा हनुमान चालीसा पठण आणि भजन संध्या कार्यक्रम सादर केला. यामध्ये विविध भक्ती गीते तसेच भजने गाण्यात आले. तसेच सामूहिक हनुमान चालीसा पठणात यामध्ये शेकडो भावीक भक्त सहभागी झाले होते. यावेळी माजी नगरसेविका कलावती शेळके व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ काका शेळके परिवाराच्या वतीने महाआरती करण्यात आली. महाआरती संपन्न झाल्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.
Post a Comment