छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा शिवसेनाच्या वतीने अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य उभे केले - संभाजी कदम
नगर - स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. त्यांचा आदर्श हा आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारावर काम करुन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. हाच आदर्श घेऊन आपण समाजात काम करत आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे संभाजी कदम यांनी केले.
शिवसेना माळीवाडा व समझोता तरुण मंडळ वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, गणेश कवटे, दत्ता कावरे, परेश लोखंडे, सुरेखा कदम, शिला शिंदे, अश्विनी जाधव, शोभना चव्हाण, मनिषा घोलप, सलोनी शिंदे, आनंदराव शेळके, अरुन झेंडे, अण्णा घोलप आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अनिल शिंदे म्हणाले, शिवाजी महाराजांचे आयुष्य समजून घ्यावयाचे असेल तर त्यांच्या चरित्रामधून आजच्या युवा पिढीला खूप काही शिकण्यासारखे आहे. पण युवक फक्त शिवाजी महाराजांना डोक्यावर घेत आहेत खर्या अर्थाने त्यांना डोक्यात घेण्याची गरज आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी पुढाकार घेत त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवत असल्याचे सांगितले.
यावेळी माळीवाडा शिवसेना व समझोता तरुण मंडळाच्यातवीने रात्री 12 वाजता भव्य फटाक्यांची अतिषबाजी करुन शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच याठिकाणी भव्य अशा एलईडी स्क्रिनवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन चरीत्र साकारण्यात आले होते.
Post a Comment