रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी तर्फे महिलांचा सन्मान आणि सायबर सुरक्षा जागृती

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी तर्फे महिलांचा सन्मान आणि सायबर सुरक्षा जागृती

अहमदनगर : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान आणि सायबर सुरक्षा जागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन पे्रमराज सारडा महाविद्यालय येथे करण्यात आले. यामध्ये महिलांसाठी सायबर सुरक्षिततेबाबत माहिती देण्यात आली. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी सौ. प्रितम गायकवाड़ यांनी महिलांसाठी सायबर गुन्हेगारीपासून बचावाचे मार्ग सांगितले. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे महिलांनी डिजिटल सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिला सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या १० महिलांना गौरविण्यात आले. या महिलांनी शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, क्रीडा, उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष योगदान दिले आहे. या कार्यक्रमाला रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटरीयन मीनल बोरांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीचे सचिव रोटरीयन प्रतिभा धूत रो सविता काले रो आरती लोहाड़े रो विभा ताँबड़े इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी असे उपक्रम गरजेचे असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
हया कार्यक्रमत महिला साठी मोफ़ात आरोग्य तपासनी आयोजित केली होती त्याचाही उपस्थित महिलानी ला भ
घेतला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन बेडेकर यानी केले. या उपक्रमाचा लाभ अनेक महिलांनी घेतला आणि त्यांच्या प्रशंसेस पात्र ठरला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post