मयूर आगरकर यांची नगर रचनाकार म्हणून निवड ; श्री विशाल गणेश मंदिराच्या वतीने सत्कारस्पर्धा-परिक्षेत यश मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत आवश्यक - अ‍ॅड.अभय आगरकर


मयूर आगरकर यांची नगर रचनाकार म्हणून निवड ; श्री विशाल गणेश मंदिराच्या वतीने सत्कार

स्पर्धा-परिक्षेत यश मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत आवश्यक - अ‍ॅड.अभय आगरकर

     नगर -    शिक्षण आज काळाची गरज बनली आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत असतात. शिक्षण पुर्ण होताच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळत असल्याने त्यांचे भविष्य घडत आहे. मयूर आगरकर यांचे यश म्हणजे अथक परिश्रमाचे फळ आहे. स्पर्धा परिक्षा देत असताना संयम बाळगावा लागतो आणि संघर्ष ही करावा लागतो. तसेच स्पर्धेत यश मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत आवश्यक असते.  त्याचेच फळ एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत नगर रचनाकार म्हणून निवड झालेल्या मयुर आगरकर यांना मिळाले, असल्याचे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी केले.

     एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत नगर रचनाकार म्हणून निवड झाल्याबद्दल मयूर आगरकर यांचा निवड झाल्याबद्दल श्री विशाल गणेश मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्‍वस्त पांडूरंग नन्नवरे, विजय कोथिंबीरे, संजय चाफे, नितीन पुंड, अरविंद आचार्य, किरण बनकर, बाळासाहेब आगरकर, राजेंद्र आगरकर आदी उपस्थित होते.

     सत्कारास उत्तर देतांना मयुर आगरकर म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची गरज असते. आज प्रत्येक क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे लक्ष निश्‍चित केले पाहिजे. ही परिक्षा सोपी नव्हती, परंतु आई-वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण जिद्दीने हे यश मिळविले. यासाठी विशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे ही प्रोत्साहन मिळाले असल्याचे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post