कल्पवृक्ष श्री स्वामी समर्थ मठात स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम व संगीत मैफल
कल्पवृक्ष श्री स्वामी समर्थ मठात
स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम व संगीत मैफल
नगर - कल्पवृक्ष श्री स्वामी समर्थ मठ दिल्लीगेट, सातभाई मळा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाचा सोहळा रविवारी दिनांक 30 मार्च 2025 पासून प्रारंभ होत आहे.
श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्ताने रविवार दिनांक 30 मार्च ‘गुढीपाडवा’ सकाळी 5.30 वाजता पहाट पाडवा व स्वामींना उठवणे यासाठी सू श्री संपदा चौधरी यांची शास्त्रीय संगीताची मैफल त्यानंतर लघुरुद्र, दिनांक 31 रोजी स्वामींचे प्रगटन सकाळी 8 वाजता व त्यानंतर प्रसाद, दिनांक 1 एप्रिल रोजी महाप्रसाद तसेच दिनांक 2 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 8 काल्याचे किर्तन ( कीर्तनकार ह. भ. प. दु तारे महाराज ) या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी अहिल्यानगर मधील सर्व भाविक व रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सौ.सुनंदा देशपांडे यांनी केले.
Post a Comment