गुलमोहर रोड स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
नगर - सावेडी उपनगरात गुलमोहर रोडवरील सावली सोसायटी मधील श्री. अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री.स्वामी समर्थ सेवा संस्था आयोजित मंदिरात 31मार्च रोजी श्री.स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन उत्सव साजरा होत असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमात शुक्रवार दि.28 ते रविवार दि.30 मार्च पर्यंत सामुदायिक श्री.गुरुलीलामृत पारायण सोहळा होणार आहे. दुपारी साडेबारा ते साडेतीन पर्यंत पारायण होणार आहे.या सोहळ्या मध्ये असंख्य महिलांनी सहभाग घेतला असून पारायण सोहळा ऐकण्याचा लाभ भाविकांनी घ्यावा.
रविवार दि.30मार्च रोजी गुढीपाडव्याला पहाटे 5 वाजता अभ्यंग स्नान, सकाळी 8 वाजता आरती, दुपारी 12 वाजता नैवेद्यआरती,सायंकाळी 7 वाजता धुपारती होऊन सायंकाळी साडेसात वाजता अनिरुद्ध धर्माधिकारी ह्यांचा अभंग वर्षा हा भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार दिनांक 31 मार्च रोजी प्रकट दिनानिमित्त पहाटे 5 वाजता श्रींना रुद्राभिषेक सकाळी 8 वाजता आरती, दुपारी साडेबारा वाजता नैवेद्यआरती दुपारी1ते 3महाप्रसादाचा कार्यक्रम होइल. सायंकाळी 6 वाजता श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या उत्सव मूर्ती व पादुकांची भव्य अशी रथ मिरवणूक निघणा आहे.सायंकाळी 9वाजता आरती, रात्री 10 वाजता शेजारती होऊन उत्सवाची सांगता होईल. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. दर्शनाचा, कार्यक्रमाचा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे
Post a Comment