मार्केट यार्ड येथील भाजीपाला व फळ व्यापार्यांच्या वतीने शिवजयंती साजरी
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार
प्रत्यक्ष आचारण्यात आणण्याची गरज - सचिन जगताप
नगर - छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य समजून घ्यावयाचे असेल तर त्यांच्या चरित्रामधून आजच्या युवा पिढीला खूप काही शिकण्यासारखे आहे. ते कुठल्या समाजाचे, जातीचे, धर्माचे नाहीत तर बहुजनांचे राजे आहेत. त्यांचे विचार प्रत्यक्ष आचारण्यात आणून दाखवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सचिन जगताप यांनी केले.
अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड येथील भाजीपाला व फळ व्यापार्यांच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची सचिन जगताप यांच्या हस्ते महाआरती करण्यात आले. याप्रसंगीत अध्यक्ष अशोक लाटे, संतोष ठोकळ, संतोष कानडे, सुशील बजाज, किरण लोंढे, अनिल ठुबे, परमनंद बजाज, अशोक निमसे, नितीन नागरे, गणेश लालबागे, सुरेश शिंदे, राहुल जाधव, अनिल ठुबे, महेंद्र लोढा, निलेश बडे, धारक, चौरे बंधू उपस्थित होते.
तसेच यावेळी शेतकरी व व्यापारी बंधूंना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Post a Comment