शालेय स्तरावर झालेल्या विविध स्पर्धेत समृद्धी सोमनाथ नजान हिने मिळविले पारितोषिके
नगर - अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूल अहिल्यानगरची इयत्ता 3 री मधील विद्यार्थीनी कु. समृद्धी सोमनाथ नजान हिने शालेय स्तरावर झालेल्या विविध स्पर्धेमध्ये चार पारितोषिके प्राप्त केले. शाळेचा शेष पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. यामध्ये कु. समृद्धी हीला इंग्रजी कथाकथन स्पर्धा प्रथम क्रमांक, मराठी कथाकथन स्पर्धा द्वितीय क्रमांक ,मिठाई बनवणे स्पर्धा द्वितीय क्रमांक, विज्ञान प्रदर्शन स्पर्धा तृतीय क्रमांक, कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे क्रीडा अधिकारी श्री आकाश थोरात यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उपप्राचार्या कविता सुरतवाला, शिक्षिका आदिती कोकाटे उपस्थित होत्या.
शाळेतील विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये कु. समृद्धी हीने हे यश संपादन केले. समृद्धीने ज्या स्पर्धमध्ये सहभाग नोंदवला त्यामध्ये तिला यश प्राप्त झाले. समृद्धीला वर्गशिक्षिका अर्चना जाधव व विविध विषय अध्यापिका, स्पर्धा प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले. आई सुरेखा सोमनाथ नजान नेहमी तिला प्रोत्साहन देत असते.
कु. समृद्धीच्या यशाबद्दल अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य प्रभाकर भाबड ,भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे प्राचार्य उल्हास दुगड, रुपीबाई बोरा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार बारगळ, श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मनियार, गीता परिवार दक्षिण अहमदनगरच्या अध्यक्षा सौ. सुनंदाताई सोमाणी, समृद्धीचे आजोबा शिवाजीराव कजबे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
कु. समृद्धीला चित्रकला, नृत्य, कथाकथन, हस्तकला, वकृत्व, खेळ, नाटक अशा विविध गोष्टींची आवड आहे.
Post a Comment