सत्यसाई जन्मशताब्दी वर्षात संस्कारक्षम उपक्रमाचे नियोजन
नगर - प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणात परमेश्वराचा वास असतो या दिव्यात्मक स्वरुपाची प्रचिती त्यांनी केलेल्या मानवी कल्याण सेवा कर्यातून प्रकट होते असे मत श्री. सत्यसाई सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यात्मिक प्रमुख व प्रभावी वक्ते मुरली भैय्या जाजू यांनी व्यक्त केले.
अध्यात्मिक गुरु भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षात राबवावयाच्या विविध संस्कारक्षम उपक्रमांचे नियोजनची बैठक येथे संपन्न झाली. त्यात त्यांचे मुख्य प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. सत्यसाईबाबा हे नेहमी मी माझ्या भक्तांवरुन ओळखतो असे सांगायचे त्यांनी आपल्या भक्तांना दिव्यात्मक स्वरुपांनो असे संबोधिले. प्रर्यायाने त्यांनी भक्तांची नैतिक जबाबदारीचे अधिष्ठान वाढविले. प्रत्येकातील दिव्यात्मक स्वरुपाचे दर्शन त्यांच्या समर्पित सेवाभावी वृत्तीतून प्रकट होते. यावर श्री.जाजू यांनी भर दिला. सत्यसाई संघटनेच्या 9 कलमी कार्यक्रमानुसार लहान मुलांना संस्कारित करणारे ‘बालविकास वर्ग’ आरोग्य सेवा, अध्यात्मिक सेवा, भजन, प्रशांती सेवा आदी मानवी कल्याण सेवा कार्यावर अधिक भर देण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. समितीचे राज्याध्यक्ष श्री धर्मेश वैद्य यांनी 55 वर्षांच्या नगर समितीच्या गौरवशाली परंपरेचा गौरव करुन नगर समितीने राज्यात समितीचे जाळे विस्तारीत केल्याचे आवर्जून सांगितले. राज्यस्तरीय अध्यात्मिक प्रमुख शाम जोशी, माहिती तंत्रज्ञान प्रमुख दिवाकर स्वामीनाथन, बाल विकास प्रमुख पद्मा दिवाकर, महिला सेवा प्रमुख कांचन वैद्य, सहसेवा प्रमुख दिलीप भामे, संभाजीनगर समितीचे जिल्हा प्रमुख विकास लोळगे आदी प्रभुतीची या प्रसंगी भाषणे झाली त्यांनी जन्मशताब्दी वर्षातील विविध नियोजनाची माहिती दिली.
नगर समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.आर.जी.कुलकर्णी, प्रा.सौ.ज्योती कुलकर्णी, व सर्वश्री नदलाल भालेराव, नरसिंग दुसा, शोभा दुसा, पद्मा बोगा, अमोल सप्तर्षी आदींनी या सभेचे आयोजन केले होते.
निमंत्रक अशोक कुरापाटी यांनी भगवान बाबाच्या मानवी सेवा कार्याचे महत्व विषद केले. याप्रसंगी शहरातील संस्कारक्षम उपक्रम राबविणारे उपक्रमशील शिक्षक, पालक, सेवाभावी कार्यकर्ते व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवान बाबांच्या आरतीने या बैठकीचा समारोप झाला.
चौकट - सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा. आणि मानवसेवा हीच माधवसेवा अशी शिकवण देणार्या भगवान श्री सत्य साई बाबांच्या जन्मशताब्दी वर्ष महोत्सवासंबधी झालेल्या नियोजन बैठकीत राष्ट्रीय अध्यात्मिक प्रमुख श्री मुरलीभैया जाजू.
Post a Comment