पानिपतच्या वीराची वाजत-गाजत
मिरवणूक काढत वीर उत्सव साजरा
नगर - पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील जाधव परिवार यांच्या वतीने होळीचे पूजन करून कुटुंब प्रथेनुसार गावातून वीराची वाजत-गाजत मिरवणूक काढली. वीराची मिरवणूक काढण्यामागे ज्यांना वीरमरण आले; त्यांना वीर म्हणतात , इतिहासात ज्या वेळी पानिपतचे युद्ध झाले त्यावेळी महाराष्ट्रातून बर्याचशा घरातून युद्धासाठी सैनिक म्हणून जी व्यक्ती गेली व मरण पावली त्यांना वीर म्हटले गेलं.
आज-काल शहीद जवानांना ज्याप्रमाणे गावात महत्त्व दिले जाते,त्यांचे पुतळे बनवले जातात, त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी वीरमरण आलेल्या व्यक्तींच्या गावात नदीकाठी मूर्ती बनवून स्थापित केल्या जात. तसेच घरातील देवघरात टाक बनवून त्यांची विधीवत पूजा अर्चा केली जाते. महाराष्ट्रात नाशिक मधून जास्त वीर पानिपत युद्धासाठी गेले होते. होळीच्या दुसर्या दिवशी पानिपतची लढाई झालेली होती असे म्हणतात म्हणूनच आपण उपासकरू जेवू त्या दिवशी घालतो.
सैनिकाच्या आवडी निवडींनुसार वीर काढणे, त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न या दिवशी केला जातो. अविवाहित किंवा ज्यांचे लग्न जमले होते परंतु वीर मरण आल्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही अशा वीरांच्या मूर्तीला देव मानून बाशिंग वाहण्याची प्रथा नाशिक मध्ये अजूनही चालू आहे. काही वीर नवसाला पावणारे आहेत.
हा सण व उत्सव ब्राह्मण लोक देखील वेगळ्या पद्धतीने साजरा करतात अशा पद्धतीने हा होळी पूजन नंतर सण मोठ्या उत्साहात सालाबादप्रमाणे साजरा केला जातो अशी माहिती श्री. संतोष जाधव यांनी दिली.
पिंपळगाव येथे हा उत्सव अतिशय उत्साहात वाजत-गाजत पार पडला. होळी पौर्णिमेनिमित्त कोरठण खंडोबा येथे पालखी छबीना मिरवणुक काढण्यात आली. या उत्सवाचे आकर्षण म्हणजे श्री छत्रपती संभाजी महाराज पेहराव केलेला मल्हार संतोष जाधव हा बालक सर्वांचे आकर्षण ठरला.
Post a Comment