छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणरोड येथे शाम नळकांडे मित्र मंडळाच्यावतीने अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी
- शाम नळकांडे
नगर - छत्रपती शिवाजी महाराजाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याचे सुराज्य केले व रामराज्य स्थापन करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यांचे कार्य सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिल आहे. ध्येय प्राप्तीसाठी लागणारी चिकाटी महाराजांच्या ठाई उपजतच होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार प्रत्यक्षात अंमलात आणणे, त्याचे अनुकरण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक शाम नळकांडे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणरोड येथील शाम नळकांडे मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक शाम नळकांडे, किसनराव नळकांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव, माजी महापौर रोहिणी शेंडगे, संभाजी कदम, संजय शेंडगे, सचिन शिंदे, सुरेखा कदम, शिलाताई शिंदे, अश्विनीताई जाधव, वैशाली नळकांडे, सौ.खैरे, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, दत्ता कावरे, संदिप दातरंगे, संजय काका शेळके, अंकुश साबळे, गणेश शिंदे, राऊत मामा, संभाजी गरड, दत्ता भापकर, सुशांत शिंदे, सोमनाथ गिते, रोहिदास डावखर, प्रज्वला नळकांडे, युवराज नळकांडे, राहुल द्यावनपेल्ली, सागर गुंजाळ, योगेश चौधरी, अनिकेत शियाळ, प्रविण लोखंडे, जालिंदर ताकपिले, बालाजी श्रीराम, गणेश पिस्का, कैलास शिंदे, सुरेश तिवारी, दिनकर आघाव गुरुजी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अनिल शिंदे म्हणाले, काळाची पावले ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केले. आपल्या सहकार्यांना, मावळ्यांना प्रेरणा देत सांघिक भावना निर्माण केली. स्वत: आघाडीवर राहून ते प्रेरणा देत. अशा थोर महापुरुषांचे विचार, आचार हे समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील, असे सांगितले.
Post a Comment