छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नंदनवन मित्र मंडळाच्या वतीने अभिवादनछत्रपती शिवाराय हे रयतेचे राजा म्हणून सर्वांच्या हृदयात- दत्ता जाधव


छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नंदनवन मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन

छत्रपती शिवाराय हे रयतेचे राजा म्हणून सर्वांच्या हृदयात

- दत्ता जाधव

     नगर - छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. संपूर्ण जगाला आदर्श राजा म्हणून हेवा वाटावा, असे विलक्षण व्यक्तीमत्व होते. राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेले महाराष्ट्रातील मराठी जनतेचे भाग्य म्हणावे लागेल. राजेंच्या जीवनातील घटना या आदर्शवत, थरारक, अंगावर काटा आणणार्‍या आहेत. शत्रूवर आपल्या तलवार आणि मावळ्यांच्या साहयाने मात करत असत. असा हा रयतेचा राजा सर्वांच्या हृदयात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही सर्वांना गौरवास्पद वाटावे असेच आहे, असे प्रतिपादन शिवसेना विधानसभा प्रमुख दत्ता जाधव यांनी केले.

     छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने नवीन टिळक रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव, दिलीप सातपुते, शिवसेना विधानसभा प्रमुख दत्ता जाधव, संभाजी कदम, दत्ता कावरे, संजय जाधव, सुरज जाधव, बबलू लोळगे, विशाल गायकवाड, अतुल जाधव, कुणाल गवळी, विकस सपाटे, आदेश जाधव, पप्पु म्हस्के, आदेश गायकवाड, ओंकार शेळके, मुंकेश बैन, दादा यंदे, ओंकार शिंदे, अवधुत जाधव, प्रशांत भोगे, ओंकार जाधव, रविंद्र जाधव, दादा साळवे आदी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post