गुढीपाडवा आणि रमजान ईद मुळे शिक्षकांचा पगार २८ मार्चपर्यंत करावे - शिक्षक नेते सुनील गाडगे; शिक्षक भरती संघटनेची मागणी

गुढीपाडवा आणि रमजान ईद मुळे शिक्षकांचा पगार  २८ मार्चपर्यंत करावे - शिक्षक नेते सुनील गाडगे  
शिक्षक भरती संघटनेची मागणी
नगर - दि. ३० मार्च रोजी गुढीपाडवा आहे. हिंदू नववर्ष गुढीपाडव्याला सुरु होते. देशात हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो.तसेच ३१ मार्च २०२५ रोजी रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे. गुढीपाडवा आणि रमजान ईद हे सण लक्षात घेऊन राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च पेड इन एप्रिलचे पगार २८ मार्च पूर्वी वितरीत करण्यात यावेत, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे पत्राद्वरे करण्यात आल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारती संघटनेचे राज्यसचिव सुनील गाडगे यांनी दिले. 
       महागाईच्या काळामध्ये शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी 28 मार्चपर्यंत शिक्षकांचे पगार करावे असे त्यांनी सांगितले 
        पगार वेळेवर होण्याबाबत शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना उचित आदेश द्यावेत, अशी ही मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने  शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे,  जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे जिल्हा सचिव विजय कराळे, सोमनाथ बोंतले जिल्हा  महिला अध्यक्ष आशा मगर कार्यवाह संजय भुसारी, कैलास जाधव, योगेश हराळे, नवनाथ घोरपडे,   सचिन शेलार,   गोरक्षनाथ गव्हाणे. उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, , उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष रामराव काळे पुणे विभागीय कार्याध्यक्ष तथा शिक्षक भरतीचे जिल्हा सचिव महेश पाडेकर संभाजी पवार हनुमंत रायकर, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख,  किसन सोनवने,  संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे,  रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर, विनाअनुदानित च्या राज्यअध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींनी केली.
--------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post