जागतिक स्तरावर होणार्या आनंद सप्ताहाचे नगरमध्ये आयोजन
नगर : आर्ट ऑफ लिव्हींग, अहिल्यानगरच्या वतीने जागतिक आनंद सप्ताह निमित्ताने निरोगी जीवनासाठी मंगळवार दि.18 मार्च 2025 ते 23 मार्च 2025 दरम्यान श्री गजाजन हॉल, चौपाटी कारंजा, महाराष्ट्र बँकेच्या बाजूस बेसमेंट, दिल्लीगेट अहिल्यानगर येथे सकाळी 6 ते 9 वाजता योग-ध्यान, प्राणायम, सुदर्शन क्रिया शिबीराचे आयेाजन करण्यात आले आहे.
या शिबीरात शारीरिक, मानसिक तणावमुक्त, आरोग्यदायी जीवन या विषयावर मार्गदर्शन व योग-ध्यान, प्राणायम, प्रात्याक्षिके करुन घेण्यात येणार आहे. निरंतर सुदर्शन क्रिया अभ्यासाने अनेक लोक सुखी जीवन जगत आहेत.
दैनंदिन जीवनात संघर्ष, ताण-तणाव, व्यसनमुक्तीसाठी आपणहून केलेले प्रयत्न, नैराश्य व चिंता या गोष्टी होत असतात. आर्ट ऑफ लिव्हींगच्या आनंद उत्सव या शिबीराद्वारे श्री श्री रविशंकरजी यांचे प्रेरणेने ठिकठिकाणी शिबीराचे आयोजन केले जाते. या शिबिर मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे आध्यात्मिक गुरू रविशंकरजी संबोधित करणार आहेत आणि दुःख तणावमुक्ति साठी वारंवार होणार्या शिबीरास चांगला प्रतिसाद देखील मिळातो. लोकांना याचे सकारात्मक ऊर्जा, लाभ मिळत आहे, योग आणि प्राणायम प्राचीन भारतीय पद्धती आहे, ज्याद्वारे शरीर, मन चांगले राहते आणि विचार करण्याची क्षमता, योग्य निर्णय घेण्यासाठी समर्थ बनविते. शारिरीक व मानसिक स्वास्थासाठी याचा अवलंब करावा, आपले शरीर सूक्ष्म प्राणशक्तींशी संबंधित असल्याने त्यांचा सराव नियमीत केल्या मानसिक शांती व आरोग्य चांगले राहते, सध्याच्या गतीमान जीवनशैलीमुळे आपले जीवन धकाधकीचे झालेले असून प्रत्येक स्तरावर ताण-तणाव, नैराश्य, चिंता या अश्या अनेक कारणांमुळे आपले आरोग्य बिघडत चालले आहे, निसर्गात होणार्या बदलामुळे आपले शरीरात वात, कफ, पित्त यामध्ये सुद्धा बदल होत असतात. आज प्रत्येकाला यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, त्यामळे आनंदमयी आयुष्य जगायचे असेल तर आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावे लागेल. नियमीत सुर्यनमस्कार, व्यायाम केल्याने आपले शरीर व मनशांती ध्यानाद्वारे टिकून ठेवता येणे शक्य आहे. निरंतर योग साधना करण्यार्या माणसांची ऊर्जा चांगली राहते, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या शिबीरात जास्तीत जास्त अहिल्यानगरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हींग, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले. अधिक माहितीसाठी 9130377551, 9422220874 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
Post a Comment