सकल मराठा समाजातर्फे रविवारी दि.23 रोजी वधू-वर मेळावा
नगर : सकल मराठा समाज व मराठा सेवा संघ आष्टी तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली सगेसोयरे वधू-वर सेवा केंद्राच्या वतीने आष्टी जिल्हा बीड येथे सकल मराठा समाज वधु-वरांसाठी रविवार दि. 23 मार्च 2025 रोजी जोगेश्वरी मंगल कार्यालय,खडकत रोड, आष्टी जि.बीड येथे सकल मराठा वधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी मराठा समाजातील विवाहइच्छुक वधु-वरांनी मोठ्या संख्येने आपली नाव नोंदणी करून हा मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन सगेसोयरे वधु-वर सेवा केंद्रांचे हरीभाऊ जगताप पाटील, मुख्य ग्रुप अॅडमिन शिवाजीराव निकम, किसनराव वाळेकर, अशोकराव गायकवाड व मराठा सेवा संघाच्या कार्यकारिणी मंडळाने केले आहे.
या महामेळाव्यात मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष उद्योजक , इंजि, तानाजी (बापु) जंजिरे ,मराठा वधु-वर सुचक कक्षाचे व जेष्ठ पत्रकार सीताराम पोकळे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्राचार्य शशिकांत कन्हेरे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई गिर्हे,वधु-वर सुचक कक्षाचे प्रमुख शिवाजीराव पाचे, जिजाऊ ब्रिगेड च्या अहिल्यानगर मा.जिल्हाध्यक्ष संपुर्णाताई सावंत, प्रा. डॉ. बाबासाहेब मुटकूळे,राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे संचालक मायाताई जगताप, शितल चव्हाण,मारुतीराव तिपाले,हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत,
मराठा समाजातील अनेक तरुण-तरुणी इच्छित स्थळ मिळत नसल्याने अविवाहित आहेत. वराची किंवा वधूची माहिती घेऊन त्यांना मनपसंत जोडीदार मिळवून देण्यासाठी सकल मराठा समाज प्रयत्न करणार आहे. त्याचे पहिले पाऊल या वधूवर महामेळाव्याने उचलले आहे. अनेक पालकांनी सकल मराठा समाजाकडे वधूवर मेळावा घेण्याची विनंती केल्याने समाजाच्या आग्रहाखातर या मेळाव्याचे आयोजन केले आहे. इच्छुक वधू-वर किंवा त्यांच्या पालकांनी नावनोंदणी सगेसोयरे वधु-वर सेवा केंद्रांचे हरीभाऊ जगताप 96890 47270 यांच्याकडे करावी, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
------------------------------
Post a Comment