सावेडी उपनगरात शुक्रवार दि.21मार्च पासून भागवत कथा ज्ञान यज्ञास प्रारंभ


सावेडी उपनगरात शुक्रवार दि.21मार्च पासून भागवत कथा ज्ञान यज्ञास प्रारंभ
नगर-अहिल्यानगर येथील सावेडी उपनगरात माऊली सभागृहात शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 पासुन ते 27मार्च 2025पर्यंत अहिल्यानगर चिन्मय मिशन ने नगरकरांसाठी श्रीमद भागवत कथा आयोजित केली असून या ज्ञान यज्ञाचा प्रारंभ शुक्रवारी सकाळी 9 वाजता सावेडीत प्रोफेसर कॉलनी चौकात भव्य मिरवणुकीने करण्यात येणार आहे.दुपारी2तेसायं. 6पर्यंत नांदेड येथील चिन्मय मिशन प्रमुख व प्रवचनकार परमपूज्य स्वामी प्रत्ययानंद सरस्वती आपल्या अमृतमय रसाळ वाणीतून कथा सांगणार आहेत.अशी माहिती अहिल्यानगर चिन्मय मिशनचे अध्यक्ष ड.डी.डी. घोरपडे यांनी दिली.
      या भागवत कथा सप्ताहामध्ये  स.7:15ते8:15 एक तास भजगोविंदम विषयावर प्रवचन होणार आहे. शुक्रवार दि.21 मार्च ते गुरुवार दि.27 मार्च 2025 पर्यंत भागवत कथा श्रवणाचा लाभ नगरकरांनी घ्यावा. अशा या दुर्मिळ योगाचा, सुवर्णसंधीची फायदा, कथा ऐकणार्‍यांसाठी चिन्मय मिशन करून देत आहे. कथा ऐकल्याने आपली पापां पासून मुक्ती होऊन मोक्ष मिळतो.अशी हि भागवत कथा आत्ममुक्तीचा मार्ग दाखवते.तेव्हा या कथा श्रवणाचा लाभ घ्यावा.असे आवाहन मिशनचे कार्यकारणी सदस्य हभप विद्याताई हारदे यांनी केले आहे.
     सप्ताहामध्ये भागवत आरती, प्रसादाचा लाभ सर्वांना मिळणार आहे.तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन चिन्मय मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post