भाजपाच्या अहिल्यानगर प्रभाग 12 च्या पक्ष निरिक्षक पदी अनिल निकम यांची निवड

भाजपाच्या अहिल्यानगर प्रभाग 12 च्या पक्ष निरिक्षक पदी अनिल निकम यांची निवड नगर - भारतीय जनता पार्टी अहील्यानगर प्रभाग 12 चे पक्ष निरीक्षक पदी शहर सरचिटणीस अनिल निकम यांची निवड करण्यात आली. त्यांना शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी निवडीचे पत्र दिले. या प्रसंगी सरचिटणीस सचीन पारखी, प्रशांत मुथा, माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी, सुवेंद्र गांधी, सौ. गिता गिल्डा, संतोष गांधी, अ‍ॅड अमोल निस्ताने, अ‍ॅड राहुल रासकर, सुनिल तावरे, दिपक देहरेकर, सौ.राखी आहेर, सौ. सुरेखा जंगम, सौ.कावेरी घोरपडे, सौ. निता फाटक, माया फसले, डॉ. दर्शन करमाळकर, दिपक देहरेकर, सतीष रासने, महावीर कांकरीया, राजेन्द्र रासने, चेतन भंडारी, महेश शिर्क, श्रीकांत लगड, रोहीत तोलाणी आदी भाजप कार्यकर्ते उपस्थीत होते. याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, नगरमधील जनता ही नेहमीच भाजपाच्या मागे उभी राहिली आहे. नागरिकांच्या प्रश्‍नांसाठी घेतलेल्या पुढाकारामुळे जनतेला ती आपलीशी वाटते. त्यामुळे युवक-नागरिक यांची भाजपाशी नाळ जुळलेली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या कामानुसार त्यांच्यावर जबाबदारी देण्यात येत आहे. अनिल निकम यांनी कार्यकर्त्यांचे चांगले संघटन केले असल्याने त्यांच्यावर पदाच्या माध्यमातून जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post