श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या 11 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न
श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या 11 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न
संतांचे विचार आजच्या पिढीकरीता एक आदर्श - - हभप गुलाब महाराज खालकर
नगर - पारायण केल्याने तसेच त्याचे श्रवण करण्याने माणसाला मोक्ष मिळण्यास मदत होते हरिनामाचा जप फार महत्वाचा आहे, देवाला हरिनामाची भूक आहे, किर्तनामध्ये देवाबद्दल प्रेम आपुलकी, भक्ती असायला हवी. संतांचे विचार आजच्या पिढीकरीता एक आदर्श आहेत. आचार, विचार, उच्चारात भगवंतांच्या नामस्मरणाने एक शक्ती निर्माण होत असते. त्यामुळे आपल्या दैनंदिनीत भगवंतांचे नामस्मरण करावे. श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या स्थापनेपासून या ठिकाणी होत असलेल्या विविध कार्यक्रमाने धार्मिकता वाढत आहे. ही समाजाच्या दृष्टीने सकारात्मक बाब असल्याचे प्रतिपादन हभप गुलाब महाराज खालकर यांचे केले.
नेप्ती येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या 11 वा वर्धापन दिनानिमित्त हभप गुलाब महाराज खालकर यांचे किर्तन झाले. याप्रसंगी नर्मदेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव, हभप संजय महाराज महापुरे, संजय जाधव, दत्ता जाधव, माजी नगरसेविका सुवर्णा जाधव, सुरेश जाधव, आदेश जाधव, लक्ष्मी जाधव, आशा जाधव, मंगल जाधव, मिनाताई सत्रे, आनंद सत्रे, कावेरी सत्रे, पुजा सत्रे, हेमंत जाधव, सुरज जाधव, डॉ.अमोल जाधव, प्राजक्ता जाधव, ऋषि जाधव, रवि जाधव, अतुल जाधव, स्नेहल जाधव, अंजली जाधव, कपिल जाधव, मानसी जाधव, राज जाधव, तनया जाधव, विजय जाधव, गणेश महाराज बडे, सावेरी सत्रे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बाबासाहेब जाधव म्हणाले, गेल्या 11 वर्षांपुर्वी श्री नर्मदेश्वर मंदिराची सर्वांच्या सहकार्याने निर्मिती झाल्याने पंचक्रोशितील भाविकांची मोठी सोयी झाली आहे. वर्षभर या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असल्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होत आहे. तसेच अध्यात्मिक कार्यक्रम आम्ही सतत या ठिकाणी राबवित असतो. परंतू यावेळी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त नामवंत किर्तनकार, प्रवचनकारांची सेवा या ठिकाणी होत असल्याने संतांचे विचार यानिमित्त भाविकांच्या कानी पडत आहे.
सकाळी मंदिरात लघुरुद्राभिषेक करण्यात आला, त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा, दुपारी किर्तन त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशितील नागरिकांनी घेतला. नगर शहरातील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी नेप्ती येथील अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास श्री विशाल देवस्थानचे पुजारी संगमनाथ महाराज, हभप शेंड महाराज, जि.प.सदस्य माधवराव लांमखडे, अरुण होळकर, रामदास फुले, एकनाथ जपकर, दिलीप होळकर, दादू चौघुले, भानुदास फुले, सोमनाथ पुंड, देवा होले, वसंत पवार, विलास जपकर, बाळासाहेब बेलेकर, शाहु होले, बाळासाहेब कोल्हे, तबाजी होळकर, शुभम कोल्हे, कांतीलाल कांडेकर, बंडू जपकर, आनंदा कर्डिले, अंबादास पुंड, सौरभ भुजबळ, अशोक ठाणगे, जालु भुजबळ, अशोक गवळी, राहुल मुकेश, श्रीधर लोमटे, अरुण नगराळे, भास्कर घोरपडे, हारुक सय्यद, संभाजी कदम, अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, शाम नळकांडे, संजय शेंडगे, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, अनिल बोरुडे, सचिन शिंदे, संपत नलवडे, दत्ता कावरे, संतोष गेनप्पा, विष्णु फुलसौंदर, गणेश बोरुडे, शेखर भुजबळ, अर्जुन बोरुडे, चंद्रकांत गाडळकर, बंटी गुंजाळ, बलभिम शेळके, दत्ता खैरे, गजानन ससाणे, महेश भनभने, संतोष चिपाटे, दत्तात्रय गायकवाड, अनंत बोरुडे, मनोज गाडळकर, गारेख पडोळे, महेंद्र वारुळे, गणेश फुलसौंदर, सुधीर लांडगे, मगनभाई पटेल, जालिंदर बोरुडे, बाळासाहेब भुजबळ, विक्रम बनकर, रतन कानडे, आकाश नरभवने, के.डी.खानदेशी, अनिल झरप, शिवाजी ससे, पारुनाथ ढोकळे, छबुनाना जाधव, प्रविण ससाणे, शिवाजी जाधव, रघुनाथ चौरे, विशाल पटवेकर, प्रताप भोजणे आदिंसह नेप्ती पंचक्रोशितील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नर्मदेश्वर मित्र मंडळ, नेप्ती ग्रामस्थ, नंदनवन मित्र मंडळ, वीर हनुमान वारकरी सेवाभावी प्रतिष्ठान आदिंच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
------
Post a Comment