गोपीचंद पडळकर व प्रा. राम शिंदे यांना मंत्रीपद न मिळाल्याने धनगर समाज नाराज: ज्येष्ठ नेते राजुमामा तागड






शेवगाव : नागपूर येथे पार पडलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात भाजपचे स्टार प्रचारक आमदार गोपीचंद पडळकर यांना डावलल्याने धनगर समाजातून रोष व्यक्त केला जात आहे. भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर यावे म्हणून राज्यातील धनगर समाजाने ओबीसीचा प्रमुख चेहरा म्हणून प्रमुख भूमिका घेतली होती.
गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांनी संबंध राज्यातील ओबीसी जागा केला व त्यांची ची मोट बांधली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी धनगर समाजाने महत्वाची भूमिका बजावली. धनगर बहुल गावात भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना लीड देण्यात आलेली असुन नवीन मंत्रीमंडळात धनगर समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचे नेतृत्व असलेले गोपीचंद पडळकर, प्रा. राम शिंदे यांना डावलल्याने समाजातून रोष आणि संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विरोधात रान पेटवण्यात गोपीचंद पडळकर यांची मोठी भूमिका असल्याने त्यांना मंत्रीमंडळात जरूर स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र कालच्या शपथविधीनंतर भ्रम निरास झाल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटलेल्या दिसून आल्या.
धनगर समाजाच्या प्रश्नासाठी केवळ अनेक बैठका घेणाऱ्या तत्कालीन शिंदे सरकारने धनगर आरक्षण अमलबजावणीसाठी सकारात्मक भूमिका घेतली नाही व ऐनवेळी सरकार म्हणून मदत केली नाही. ही बाब विसरून धनगर समाजाने विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने भाजपला मतदान करून तिसऱ्यांदा सत्तेवर बसविले. तसेच ओबीसीचा प्रमुख चेहरा म्हणून धनगर समाज भाजपच्या पाठिशी ठामपणे उभे राहिला या बदल्यात समाजाचे नेतृत्व असलेले आ. गोपीचंद पडळकर व प्रा. राम शिंदे यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्री न केल्याने धनगर समाज नाराज झाला आहे. आरक्षण नाही, योजनासाठी निधी नाही, मंत्रीमंडळात स्थान नाही एकुणच पुन्हा फसवणूक झाल्यासारखे वाटते. अशी प्रतिक्रिया धनगर समाज उपोषणकर्ते राजुमामा तागड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.
मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी सर्व मीडियामध्ये मंत्रिपदासाठी चर्चेत असणारे भाजप आ. गोपीचंद पडळकरांना मंत्रिपद न मिळाल्याने धनगर समाजासह ओबीसी समाजात तीव्र नाराजी पसरली असून भाजपा पक्षाकडून राजकीय लढाईत गोपीचंद पडळकर यांचा केवळ ढाल म्हणून वापर करण्यात आला आणि मंत्रिपदाची संधी देताना मात्र डावलले. मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्त्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे आपल्या परखड वकृत्व वकृत्व आणि लोकप्रिय असणारे आमदार गोपीचंद पडळकर हे ओबीसीचे नेते म्हणून राज्यभर काम करीत आहेत. ज्यावेळी फडणवीस व भाजपावर महायुती सरकारच्या अनेक नेत्यांकडून खालच्या पातळीची टीका केली जाते त्यावेळी भाजपामधील कोणीही पुढाकार घेत नाही. परंतु एकमेव गोपीचंद पडळकर हे ढाल बनवून पक्षासाठी पुढे आणले जाते. त्याला समाजातून मोठा पाठिंबाही मिळतो असे असताना राजकीय लढाईसाठी त्यांचा वापर भाजपने केला विरोधकावर टीका टिप्पणी करण्यासाठी बळ दिले मात्र मंत्रीपदाची संधी देताना डावले त्यातून धनगर समाजात सरकार विरोधात रोष निर्माण झाला आहे. 

*सोशल मीडियावर तीव्र नाराजी* 
सध्या सोशल मीडिया जनतेचे प्रमुख साधन बनले आहे. गोपीचंद पडळकर व प्रा. राम शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने मंत्रिपद न दिल्याने सोशल मीडियावरही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. 
चौकट 
राज्यात धनगर समाज दोन नंबरवर असतांना मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने गोपीचंद पडळकर व प्रा. राम शिंदे यांना मंत्री नं केल्याने राज्यातील धनगर समाज पूर्णपणे अस्वस्थ झाला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत समाज यांना त्यांची जागा दाखवून देईल.
-- राजुमामा तागड (धनगर समाज उपोषणकर्ते)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post