आदिवासींचे बाणेदार नेतृत्व हरपले
महाराष्ट्र राज्याचे मा. आदिवासी विकास मंत्री स्व. मधुकररावजी पिचड साहेब यांचे अलीकडेच दिः 06/12/2024 रोजी निधन झाले आणि सकल आदिवासी समाजावर शोककळा पसरली. आदिवासी हिताची तळमळ, वंचित व उपेक्षितांचा विकास तसेच आदिवासी अस्मिता जपणारे कल्पक दूरदृष्टी असणारे बाणेदार नेतृत्व आज खर्या अर्थान हरपले आहे.
सामाजिक प्रेरणा
वंदनीय मधुकरराव पिचड, मा. आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा जन्म राजूर ता. अकोले, जि. अ. नगर येथे 1 जून 1949 मध्ये झाला. त्याचे शिक्षण पुण्याच्या सर परशुराम भाऊ (एस. पी. कॉलेज) मध्ये झाले. महाविदयालयीन जिवनातच त्यांची खर्या अर्थाने सामाजिक न्याय संघर्षास सुरवात झाली. सन 1962 मध्ये बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर आपले गुरु ऋषितुत्य व्यक्तिमत्व मा. प्रधान सर (मास्तर) यांनी आदिवासी समाजहिताचा कानमंत्र देऊन त्यांना खर्या अधनि प्रेरीत केले. त्यांना कोणत्याही शासकीय विभागात उच्चपदस्थ नोकरीची संधी उपलब्ध असतांना सुध्दा त्यांनी केवळ नोकरी न करता समाज कार्याकडे आपली वाटचाल चालू केली. मा. पिचड साहेब यांच्या राजकीय करीअरची सुरवात खार्या अधनि झाली ती सामाजिक प्रेरणेतूनच उपजतच असलेले नेतृत्वगुण व सामाजिक पिंड यामुळेच त्यांनी त्याकाळी संपूर्ण अकोले तालुका पिंजून काढला. येथील आदिवासी जनतेचे समाज जीवन, त्यांची संस्कृती तसेच आदिवासीचे प्रश्न याचा अभ्यास करुन त्यांनी आपल्या सामाजिक लढ्याचे रणशिंग फुंकले. कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसतांना केवळ समाजिक बांधिलकीतूनच त्यांनी आपले स्वाभीमानी नेतृत्व निर्माण केले.
पायाभूत सेवांचे जाळे:
मूलतः आदिवासी समाज हा निसर्गपूजक असून तो डोंगराळ, दुर्गम अशा भागात वास्तव्य करत आहे, अज्ञान, दारिद्र्य यामध्ये पिचलेला आदिवासी समाज हा शिक्षण, आरोग्य इत्यादी गोष्टीपासून कायमच वंचित राहिला. त्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचवावा यासाठी मा. पिचड साहेब यांनी सुरवातीच्या काळात 1962-63 मध्ये गावोगावी सहकारी तत्वावर दूध उत्पादन संस्था स्थापन करुन त्यांचे जाळे निर्माण केले व आदिवासी जनतेला त्याचा आर्थिक लाभ मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तसेच राजूर येथे 1964 मध्ये आदिवासी उन्नती सेवा मंडळाची स्थापना करुन त्याअंतर्गत अनेक ठिकाणी तालुक्यात आदिवासी आश्रम शाळा स्थापन करण्यात पुढाकार घेतला. अशा प्रकारे अनेक पायाभूत सुविधा निर्माण करुन सामाजिक समतोल राखण्याचे काम त्यांनी केले. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आदिवासी विकास विभागास स्वतंत्र स्थान देऊन आदिवासीचे स्वतंत्र बजेट तयार करण्याचे ऐतिहासिक काम केले मा. पिचड साहेब यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतांना त्यांनी राजकारण व समाजकारण यांची अतूट सांगड घातली.
न्यायीक संघर्षः
ज्या भंडारदरा पाण्यावर अनेकवेळा राजकारण झाले परंतु न्याय तत्वावर आधारीत समान वाटप झाले नाही. यासाठी आदिवासी व बिगर आदिवासी समाजासाठी भंडारदरा धरणाच्या पाण्याचे फेरवाटप व्हावे यासाठी त्यांनी 1980 मध्ये चाकबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे त्यांना शासनाच्या रोषाला बळी पडावे लागले परंतु त्यांनी त्यास दाद दिली नाही. या आंदोलनाची परीणिती अशी झाली की त्यांनी संपूर्ण अकोले तालुक्याला पाणी तर मिळवून दिलेच परंतु ही न्यायसंघर्षाची लढाईही जिंकली. याउलट अलीकडेच त्यांनी भंडारदरा व निळवंडे धरणातून मराठवाडयास पाणी सोडण्याबाबत समन्यायाची भूमिका घेऊन आपण मानवतेचे पुरस्कर्तेअसल्याचे दाखवून दिले.
लढा आदिवासी आरक्षणाचाः
सन 1976 मध्ये आदिवासी विस्तारीत क्षेत्रबंदी उठविल्यामुळे बोगस आदिवासीची घुसखोरी फार मोठ्या प्रमाणात झाल्याचे 1981 च्या जणगणनेच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. यातूनच सन 1994 मध्ये नागपूर येथील हिवाळी आधिवेशन दरम्यान गोवारी समाजाने आदिवासी आरक्षणाच्या मागणीसाठी विधीमंडळावर मोर्चा काढण्यात आला. प्रचंड असा हा मोर्चा पोलिसांनी अडविला परंतु मोर्चा ने उग्र रूप धारण केल्याने चेंगराचेंगरीत गोवारी हत्याकांड घडले. त्यावेळी मा. पिचड साहेब यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन आपल्या मंत्री पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. सत्तेत असूनही सत्ते विरुध्द बंड पुकारण्याचे धाडस कोणी करु शकत नाही परंतु स्वाभीमानी अशा या नेतृत्वाने आपल्या आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी बोगस आदिवासी विरुध्द संघर्षात आपल्या मंत्री पदाचा व आमदारकीचा राजीनामादेऊन आपल्या आदिवासी समाजासाठी आपण कोणत्याही संघर्षासाठी तयार आहोत, हा बाणेदारपणा दाखविता.
अलीकडेच (2014-15) त्यांनी धनगर समाजाच्या आदिवासी आरक्षणाच्या मागणी संदर्भात फार मोठे जनआंदोलन उभारुन शासनविरोधी चळवळ उभी केली. पुढे त्यांच्याच नेतृत्वाखाली बोगस आदिवासींधी घुसखोरी रोखण्यासाठी आदिवासी क्षेत्रबंदीचा ट्रायबल एरिया रिस्ट्रीक्शन कायदा तसेव जातपडताळणी कायदा 2000 महाराष्ट्रात लागू झाला. या कायदयाची कटाक्षाने अंमलबजावणी व्हावी याकरीता डॉ. गारे साहेब यांच्या साहित्य संपदेचा महाराष्ट्र आदिवासी सर्वेक्षणास फार मोठा मूलाधार होता. अशा प्रकारे सदरच्या कायद्यामुळे खर्या आदिवासींना सामाजिक न्याय मिळवून देण्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे त्यांच्याच काळात बोगस आदिवासीनी हटाव हो सामाजिक चळवळ प्रकर्षनि निर्माण झाली. त्याचाच परिणाम म्हणून की काय बोगस आदिवासीनी डॉ. गारे साहेब व मा. पिचड साहेब यांनाच बोगस आदिवासी ठरवले तसेच त्यांना (डॉ. गारे व मा. पिचड सो.) कथित धमक्यांनाही सामोरे जावे लागले.
उदयोग उभारणी / जलसिंचन सुविधाः
आपल्या तालुक्यात छोटे मोठे उदयोग व सिंचन प्रकल्प उभे रहावेत येथील जनतेला रोजगार मिळावा तसेच त्यांची आर्थिक व सामाजिक प्रगती व्हावी यासाठी तालुक्यात महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ एम. आय. डी. सी. अंतर्गत छोटे मोठे उद्योग उभे रहावेत यासाठी त्यांनी कायम शासन दरबारी पाठपुरावा केला. परंतु योग्य हवामान, पायाभूत सुविधा तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे या भागात एम आय डी. प्रकल्प उभे राहणे अशक्य आहे, असा प्रतिकूल शेरा (रिमार्क) शासनाने दिला तेव्हा ते शांत बसते मात्र त्यानंतर 1990 मध्ये कवळ 11 महिन्यातच तेव्हा संरक्षण मंत्री असलेले मा शरद पवार पांच्या सहकायनि अडीच हजार 2500) टनी साखर कारखान्याची अकोले येथे मुहूर्तमेढ रोवली. आपल्या तालुक्यातील एम आय डी सी ची स्वप्न साकार व्हावे म्हणून तत्कालीन उदयोगमंत्री मा नारायण राणे यांच्याशी सदरच्या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा कली आदिवासी बांधवांबा जीवनमानावा दर्जा उंचवावा त्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी तालुक्यात आदिवासी व बिगर आदिवासी यांचे प्रशेती क्षेत्रास मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होऊन त्यांची शेती सुजलाम, सुफलाम व्हावी याकरीता त्यांनी आंबीत, कोथळे, बलठण, टिटवी, पिंपळगाव खांड, इ ठिकाणी सिंचन प्रकल्पांची निर्मिती कली.
पिचड पॅटर्न:
म्हाळादेवी की निळवंडे या वादात पुढे निळवंडे या गावी उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे धरणाचे दि. 28 मे 1992 रोजी भूमीपूजन झाले. निळवडे प्रकल्पाबाधीत झालेली गावे यामध्ये कोहंडी, दिंगबर, कोदणी टिटवी पिपळगाव नाकविदा, शेलविहिरे, पिपरकणे इ. गावांचे आदर्श पुनर्वसन व्हावे म्हणून मा. पिचड साहेब यांनी निळवंडे प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीची स्थापना कैली या समितीचे अध्यक्ष श्री यशवंत आभाळे, समितीचे सदस्य मनोहर गवारी, रामहरी आवारी, राजेंद्र डावरे, विठठल आभाळे इ. सदस्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली शासनाची सामाजिक लढा देण्याचे काम केले. निळवंडे धरणामुळे विस्थापित होणार्या प्रकल्पग्रस्त जनतेचे आदर्श पुनर्वसन व्हावे म्हणून त्यांनी कायम शासनदरबारी लढा दिला प्रकल्प ग्रस्तांच्या नुकसान भरपाईचे निकष बदलण्यास शासनास भाग पाडले आज देशात नर्मदा प्रकल्प, तिहरी प्रकल्प, डिभे प्रकल्प, जायकवाडी प्रकल्प, इ. अनेक छोटे मोठे प्रकल्प आहेत परंतु अजूनही त्यांचे 100 टक्के पुर्नवसन झाले नाहीं मात्र मा पिचड साहेब यांनी महराष्ट्र राज्यात या प्रकल्पाबाबत आधी पुर्नवसन मग धरण असे सूत्र अवलंबिले व तमाम आदिवासी व बिगर आदिवासी पांच्या आदर्श पर्नुवसनासाठी लढा देऊन त्याचे तयार केला हाच पॅटर्न पिचड स्तरीय कालव्यांचा प्रश्नही मार्गी होतो. यशस्वी पुर्नवसन करुन दाखविले व राज्यात एक आदर्श पॅटर्न तयार केला हाच पॅर्टन पिचड पॅटर्न म्हणून राज्यात ओळखला जात आहे. प्रलंबित उच्य लागण्याचे संकेत आहेत यामागे त्यांचा दुर्दम्य आशावाद व्यक्त
आदिवासी संस्कृतीचे जतनः
आदिवासी कला संस्कृती तसेच समाज विकासासाठी संशोधन करणान्या पुणे येचील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (टो आर टी आय सुवर्ण महोत्सव कार्यक्रम नुकताच दि 28/12/2013. राजी मा राष्ट्रपती महोदय प्रणव मुखजी यांचे हस्ते पार पडला या कार्यक्रमास तत्कालीन मा शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री, मा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच मा. मधुकरराव पिचड यांची उपस्थिती प्रामुख्याने होती. आदिवासी साहित्य व सस्कृती संवर्धन करणार्या या प्रमुखा संस्थेस स्वायत्त दर्जा प्राप्त व्हावा म्हणून मा. पिचड साहेब आग्रही होते त्याचीच परिणीती म्हणून अलिकडेच महाराष्ट्र राज्य सरकारने या संस्थस स्वायत्त दर्जा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला स्वायत्त दर्जा प्राप्त होणारी ही पहिलीच सरकारी संस्था आहे स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याने संस्थेस प्रशासकीय अधिकार प्राप्त होऊन आदिवासी समाज विकासाचे मूल्यमापन करणे सुलभ होणार आहे.
आदिवासी साहित्य व संस्कृतीचे जतन व्हावे याकरीता यासंस्थेस स्वायतत्ता मिळवून देण्पात मा पिचड साहेब यांचं पोगदान फार मोठे आहे याखेरीज संस्थेच्या कलादालनास मा पिवठ सा यांचे उपस्थितीत व मा. राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते थोर आदिवासी साहित्यक व विचारवंत के डॉ. गोविद गारे यांचे स्मृती प्रित्यर्थ त्यांचं नाव संस्थेच्या कलादालनास देण्यात आले व त्याचे डॉ गोविंद गारे कलादालन असे नामकरण करण्यात येऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गोरव करण्यात आला हा ऐतिहासिक निर्णय आदिवासी समाजाच्या दृष्टीने निश्चितच भूषणावह आहे.
आदिवासी अस्मिता:
काही आदिवासी क्रांतीकारकांनी ब्रिटीश शासनाविरुध्द तसेच सावकारशाही विरुध्द प्रखर असे लढे दिले यात क्रांतीवीर बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, राणी दुर्गावती, खाजा नाईक इ. प्रमाणेच या प्रभावळीमध्ये नाव घेण्यात येईल ते वीर राघोजी भांगरे यांचे। अशा या वीर सेनानीचे उचित स्मारक व्हावे व त्यांचा हा लढ़ा आदिवासी जनतेला प्रेरणा देणारा ठरावा तसेच आदिवासीची अस्मिता कायम जागृत राहावी त्यासाठी डॉ गोविंद गारे, आदिवासी साहित्यिक व विचारवंत यांनी 1978 पासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला त्याचबरोबर विविध आदिवासी संघटना, संस्था यांनीही मा. मधुकरराव पिचड आदिवासी विकास मंत्री यांच नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक लढा दिला. याचीच फलनिष्पत्ती म्हणून दिनांक 2 मे, 2014 रोजी त्यांच्या स्मृतिदिनी मा पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते व मा पिचड साहेव आदिवासी विकास मंत्री यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील चौक ’आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे भांगरा चौक असे नामकरण करण्यात आले.
अलीकडेच भंडारदरा धरणाचे (विल्सन डॅम) ’आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलशय’ असे नामकरण स्व. पिचड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
राजकीय पटलः
अगदी जवळून पाहिलेले व्यक्तीमत्व म्हणजे मा. पिचड साहेब प्रचंड झंझावत व सामाजिक ऊर्जा तसेच प्रभावी वकृत्व शैली या जोरावरच त्यांनी राजकीय पटलावर आपले सामाजिक स्थान निर्माण केले आपले कार्यकर्तुत्वावरच त्यांनी सन 1972 पासून जिल्हा परीषद सदस्य, आमदार, मंत्री, विरोधी पक्ष नेते ते राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष या पदावर आपली मोहोर उमटविली.
स्व. मधुकररावजी पिचड साहेब यांचे स्मृतीस विनम्र अभिवादन!
मा. काशिनाथ गवारी
आदिवासी अभासक
(8888697428)
Post a Comment