अहिल्यानगर: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी कर्जत येथे आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासाठी घेतलेले प्रचारसभा चांगलीच गाजवली. यावेळी त्यांनी खास त्यांच्या स्टाईलने कविता करत राम शिंदे यांचा प्रचार केला. आठवले म्हणाले
'रोहित पवार यांचे बंद होणार आहेत सर्व धंदे कारण निवडून येणार आहेत आता राम शिंदे'
यावेळी राम शिंदे, माजी खासदार साबळे, भाऊसाहेब वाकचौरे,सुनील साळवे, संजय भैलुमे, प्रवीण घुले, कैलास शेवाळे, शशिकांत पाटील, अशोक जायभय, अंबादास पिसाळ, काकासाहेब तापकीर,दादासाहेब सोनमाळी, बापूसाहेब नेटके, तालुकाध्यक्ष शेखर खरमारयां,च्यासह मतदारसंघातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आठवले पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी संविधानाच्या विरोधात विदेशामध्ये जाऊन वक्तव्य केले, त्यांनी संविधान बदलण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा माझ्या सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशारा श्री आठवले यांनी दिला. राहुल गांधी यांनी मानसे जोडण्याची काम करावे तोडण्याचे नाही. नरेंद्र मोदी यांनी घटनेला साक्ष ठेवून सर्व काम ते करत आहे त्यामुळे त्यांच्याविषयी विरोधकांनी अपप्रचार करू नये अशी श्री आठवले यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की राज्यामध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असून त्यामध्ये राम शिंदे यावेळी नक्की मंत्री होते असा विश्वास मला वाटतो.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माझ्या प्रचारामध्ये येऊन माझ्यावर असणारे त्यांची प्रेम या ठिकाणी दाखवले आहे. सन 1992 ला समाज कल्याण मंत्री असताना रामदास आठवले चोंडी मध्ये आले होते त्यावेळी मी एकटा त्यांच्या स्वागतासाठी थांबलो होतो या घटनेला बत्तीस वर्षे झाले. कोणी कितीही मोठी व्यक्ती असली तरी राजकारणामध्ये दर पाच वर्षांनी त्याला जनतेसमोर हात जोडावे लागतात हीच बाबासाहेबांची मोठी किमी आहे असे राम शिंदे म्हणाले. या मतदारसंघांमध्ये मी विधान परिषदेचा आमदार होण्याच्या अगोदर व राज्यांमध्ये महायुतीचे सरकार येण्यापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू होती परंतु ही दडपशाही मी आमदार झाल्यानंतर मोडून काढली आहे. हे परकीय माणसे तुमचा आमचा विकास नाही तर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी येथे आले आहे त्यामुळे आता यांना परत पाठवण्याची वेळ आली आहे असे राम शिंदे यावेळी म्हणाले.
Post a Comment