रोहीत पवारांनी कीतीही कट-कारस्थान केले तरी भुमिपुत्र आ,प्रा राम शिंदे यांचाच विजय निश्चित: डोनगावचे उप सरपंच अजित यादव

आ,प्रा राम शिंदेसाहेब सर्वधर्म समभाव जपणारं‌ नेतृत्व,विरोधकांच्या अपप्रचाराला कर्जत-जामेडकरांनी बळी पडु नये-भाजपा नेते मा,अजित यादव यांनी केलं आवाहन 
कर्जत-जामखेडचे भुमिपुत्र आ, प्रा राम शिंदेसाहेब यांनी नेहमीच कर्जत जामखेडच्या जनतेला समान न्यायाची भुमिका घेतली आहे,जातीधर्माच राजकारण त्यांच्याकडुन कधीचं केल गेल नाही, कामानिमित्त भेटणाऱ्या व्यक्तीला किंवा अडचणीच्या काळात मदत मागणाऱ्या कुठल्याच व्यक्तीला त्यांनी आजतागायत जातधर्म न विचारता शक्य तेवढी मदत करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे,
सर्वसामान्य कुटुंबातुन संघर्षातुन स्वबळावर पुढ आलेलं नेतृत्वाला राजकारणात जात नसते हे शिंदेसाहेबांनी त्यांच्या कामातुन अनेकवेळा दाखवुन दिलं आहे,विरोधकांना पराभवाची चाहुल लागल्याने त्यांचे अनेक स्थानिक नेते वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परीषद घेऊन त्यांच्या नेत्याने लिहुन दिलेली स्क्रिप्ट मिडीयासमोर वाचुन दाखवत आहेत,त्यामध्ये मतदारसंघाबाहेरील वेगवेगळ्या समाजाच्या नेत्यांविषयी सहानुभुतीची वक्तव्य करून मतदारसंघात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत,
आ रोहीत पवार हे कर्जत-जामखेडकरांनी दिलेल्या संधीला आणि विश्वासाला अपात्र ठरल्यामुळे जनतेच्या मनात रोष असल्याचं त्यांच्या लक्षात आलं असल्याने रोहीत पवार हे सामाजिक सलोखा बिघडविण्याचा खेळ खेळत आहेत,
रोहीत पवारांच्या पाच वर्षाच्या काळात ते अडीच वर्षे सत्तेतही होते,कर्जत-जामखेड मतदारसंघाविषयी खुप काही करण्याची संधी असतानाही त्यांनी सत्तेच्या काळात कोरोनाचं कारण आणि बोगस स्टंटबाज करत आ,प्रा राम शिंदे यांच्यावर खोटे आरोप करत कसलही विकासकाम मतदारसंघात केलं नाही,त्यांच्या घरातील महीलांनीही कर्जत-जामखेड मधील महीलांची बचतगटाच्या माध्यमातून फसवणुक केली,बचत गटाच्या माध्यमातून अनेक महीलांना मोठमोठी आश्वासन देऊन त्यांची पुर्णपणे निराशा केली या सगळ्या गोष्टी आता कर्जत जामखेडच्या जनतेच्या लक्षात आल्यामुळे कर्जत-जामखेडची जनता रोहीत पवार आणि कुटुंबियांपासुन दुर होत असल्यामुळे रोहीत पवार स्थानिक नेत्यांना स्किप्ट लिहुन देऊन
कर्जत-जामखेडचे भुमिपुत्र आ,प्रा राम शिंदेसाहेबांच्या विरोधात बोलण्यासाठी दबाव टाकत आहेत.
रोहीत पवारांनी कीतीही कट-कारस्थान केले तरी भुमिपुत्र आ,प्रा राम शिंदेसाहेबांचा विजय निश्चित असल्याच यावेळी बोलताना डोनगावचे उप सरपंच मा अजित यादव यांनी सांगितले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post