लाडक्या दाजी योजनेअंतर्गत अनुदान देण्यात यावे:मनसेची मागणी

 
लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यात आलेत तसेच लाडक्या दाजीसाठी सुद्धा लवकरात लवकर या आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुदान देण्यात यावे
 आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजारांचे  अनुदान देण्यात यावे मनसेचे शहर सचिव डॉ संतोष साळवे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे  निवेदनाव्दारे मागणी 
 
नगर -  महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत १९५८ पासून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्याची योजना राबवण्यात येत आहे.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, बौद्ध, विशेष मागासप्रवर्ग यापैकी एका व्यक्तीने सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन व शिख या व्यक्तींशी विवाह केल्यास अथवा दोन वेगळ्या प्रवर्गातील व्यक्तींनी विवाह केल्यास प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना आहे. जातीभेद निर्मूलनासाठी, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने आर्थिक साहाय्य योजना सुरू केली. या योजनेचे अनुदान अजूनही प्रलंबित आहे. समाजामधील अस्पृश्यता नष्ट व्हावी, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजना सुरू केली आहे. आंतरजातीय विवाह करून शासनाच्या प्रोत्साहन योजनेचा सुद्धा मोठ्या संख्येने जोडपी लाभ घेत असल्याचेही पुढे येत आहे. त्यामुळे या योजनेच्या दृष्टीने सकारात्मकता वाढत आहे जाती व धर्मांच्या भक्कम भिंतींना ओलांडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या धाडसी तरूण तरुणींना अनेकदा कुटुंबातून बेदखल केले जाते. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता भासते.परंतु,शासनाची योजनाही कागदावरच उरल्याने अशा जोडप्यांना संसाराची घडी बसवणे अवघड बनले आहे, संबंधित आंतरजातीय विवाह केलेल्याजोडप्यांना निधी उपलब्ध नसल्याची कारणे सांगितली जातात असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रारी आलेल्या आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यामधील जे तरुण-तरुणी इतर जातीय विवाह करतात त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार हे ५००००/- हजार रुपये अनुदान देत असते सामाजिक न्याय विभाग (समाज कल्याण) जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे अर्ज देऊनही सुद्धा एक वर्ष झाले तरी कोणत्याही प्रकारचे अनुदान प्राप्त झालेली नाही तरी ज्यांनी अनुदानासाठी अर्ज केलेले आहेत त्यांचे अनुदान जसे लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यात आलेत तसेच लाडक्या दाजीसाठी सुद्धा लवकरात लवकर या आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर सचिव डॉ संतोष साळवे यांनी केली आहे . .



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post