अहमदनगर महाविद्यालयात महात्मा गांधी यांची 156 वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

     नगर - अहमदनगर महाविद्यालयात गांधी अभ्यास केंद्र व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने महात्मा गांधी यांची 156 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

      डॉ. मिनल काटकोल, मानसोपचारतज्ज्ञ, सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर यांनी ’ मोबाईलचे दुष्परिणाम आणि मानसिक आरोग्य ’ या विषयांवर मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शन पर भाषणात त्यांनी मोबाईलमुळे मानवी डी.एन.ए. धोक्यात येत आहे अशी चिंता व्यक्त केली. मोबाईल वापरासाठी प्रत्येकाने वेळापत्रक करावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

      डॉ. विजयकुमार मुंढे उपायुक्त यांनी ’पर्यावरण आणि गांधी विचार’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी पर्यावरण सुरक्षा ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. महात्मा गांधी यांची सत्याग्रही विचारधारा पर्यावरण समतोल राखण्यात महत्त्वपूर्ण विचार आहे. त्याचे प्रत्येकाने पालन केले पाहिजे. जीवनामध्ये पर्यावरणपूरक कार्य करणे हा संस्कार आहे. त्याचे पालन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी करावे. दैनंदिन स्वच्छता, वृक्षारोपण, वृक्ष जतन हा मंत्र विद्यार्थ्यांनी अंगीकारावा , तरच पर्यावरण र्हास होणार नाही.असे मत व्यक्त केले.

             या कार्यक्रमाच्या वेळी गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने गांधी विचारांवर आधारित निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये अनुक्रमे  वरिष्ठ महाविद्यालय गायकवाड श्रद्धा संतोष - प्रथम क्रमांक , शिंदे राधिका बाळू - द्वितीय क्रमांक, मिना रुपाली - तृतीय क्रमांक, पगारे साक्षी राहुल - तृतीय क्रमांक, परदेशी कशीश - उत्तेजनार्थ, कनिष्ठ महाविद्यालय  गौड केशव शैलेंद्रकुमार - प्रथम क्रमांक, ओहळ प्रार्थना बापू -  द्वितीय क्रमांक, मुळे स्नेहल राजेंद्र - तृतीय क्रमांक,

 साबळे रुदा सुधाकर - उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे.

      महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी जयंती चे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वतीने कु. साक्षी भोसले आणि धीरज कुमार राणा यांनी मनोगत व्यक्त  केले. त्यांनी गांधी विचार व आजची तरुणाई याविषयी विचार मांडले. यावेळी उपप्राचार्य प्रा दिलीप कुमार भालसिंग. डॉ. प्रीतम कुमार बेदरकर. डॉ. रज्जाक सय्यद , विभाग प्रमुख, समन्वयक आणि मोठ्या संख्येने प्राध्यापक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. विलास नाबदे यांनी केले तर आभार राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुधीर वाडेकर यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय बनसोडे यांनी केले.

---------

     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post