माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांची गावभेट जनसंवाद पदयात्रा सुरु. विधानसभा निवडणूक प्रचाराची ही पहिली फेरी ठरणार
३२३ किलोमीटर अंतर; भूमिपुत्र असल्याने प्रचंड प्रतिसाद.
३२३ किलोमीटर अंतर; भूमिपुत्र असल्याने प्रचंड प्रतिसाद.
जामखेड, (प्रतिनिधी )आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी गावभेट 'जनसंवाद पदयात्रा' प्रारंभ मंगळवारी (ता. २४) जातेगाव येथील श्रीक्षेत्र केदारेश्वराचे दर्शन घेऊन केला .आजपासून कर्जत- जामखेड विधानसभा क्षेत्रात पाच दिवस चालणारी आणि ३२३ किलोमीटरची ही पहिलीच पदयात्रा असून, राजुरी, घोडेगाव, साकत व पाटोदा या गावांमध्ये मुक्काम असतील. समाप्ती बोर्ले गावात होणार आहे. शिंदे यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराची ही पहिली फेरी ठरणार आहे.
उमेदवारीची घोषणा, प्रचार प्रारंभाची औपचारिकता बाकी
कर्जत-जामखेड मतदारसंघ आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षामुळे गेल्या अडीच वर्षांपासून चर्चेत आहे. त्यातच अशा निरनिराळ्या फंड्यांमुळे राज्यात लक्षवेधी ठरतो आहे. शिंदे यांचे नुकतेच दोन्ही तालुक्यांत जिल्हा परिषद गटनिहाय 'रक्षाबंधन' सोहळे पार पडले. त्यापाठोपाठ अन्य पक्षातून येणाऱ्या नेत्यांचे प्रवेश सोहळे झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. यातून त्यांच्याकडे नेत्यांचा मोठा फौजफाटा जमा झाला. विरोधी उमेदवार निश्चित असल्याने आता केवळ उमेदवारीची घोषणा आणि प्रचाराचा नारळ वाढविण्याची औपचारिकता राहिलेली आहे.
विकासकामांची माहिती देऊन प्रश्न जाणून घेणार
जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून आमदार शिंदे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेणार आहेत. तालुक्यात त्यांनी केलेल्या विकासकामांची माहितीही जनतेला देणार आहेत. उर्वरित प्रश्न जाणून घेत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. पदयात्रेदरम्यान ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी भोजनासाठी थांबणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
Post a Comment