शिक्षण महर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष अशोकराव पाटील यांच्या कडून अभिवादन

 शिक्षण महर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष पै. अशोकराव पाटील यांच्या कडून अभिवादन
इस्लामपूर (बाजरंग कदम ) शिक्षण महर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मूळ गावी ऐतवडे बुद्रुक, ता . वाळवा येथे कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा. पै. श्री. अशोकराव पाटील (तात्या) यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 याप्रसंगी कुरळप गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. मदन शेटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष मा. श्री. अमोल गायकवाड तसेच बाबासाहेब गायकवाड बाबू गोंडा पाटील, राहुल काळुगडे, शंकर गुरव, सचिन माने, विराज माने, स्वराज माने, प्रकाश कांबळे, जितेंद्र कांबळे, शंभू कांबळे, रमेश कांबळे, प्रतीक पाटील युवाशक्तीचे अध्यक्ष श्री. संतोष माने व युवाशक्तीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते व पै. अशोकराव पाटील (तात्या) युवाशक्ती तर्फे १००० बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ही पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला पै
 अशोकराव पाटील (तात्या) युवाशक्ती तर्फे प्रभात फेरीतील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. शेवटी आभार सामाजिक कार्यकर्ते  संतोष माने यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post